Tarun Bharat

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :


पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दहा बारा दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची झुंज अपयशी ठरली. आज उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


साने यांना 25 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पिंपरी मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता आणि आज त्यांची प्राणज्योत मावळली. 


दरम्यान, साने हे चिखली येथून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लॉक डाऊनच्या काळात साने यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. गरिबांना धान्य वाटप, अनेकांना आपल्या गावी परत जाण्यास मदत केली. अशात ते अनेक गरजूंच्या संपर्कात येत होते. जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यात त्यांना थोडा त्रास जाणवू लागला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सानेंनी कोरोनाची चाचणी केली. आणि त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. सुरुवातीला लक्षणे फार कमी होती. ते लवकर बरे होतील असे वाटत असतानाच त्यांना निमोनिया देखील झाला. अखेर आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

Related Stories

शिवशक्ती-भीमशक्तीसोबत लवकरच ‘लहूशक्ती’ दिसणार- उद्धव ठाकरे

Archana Banage

कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी

datta jadhav

कोकणात चाकरमान्यांच्या नियोजनासाठी शिक्षकांना ड्युटी; शिक्षक संघटना नाराज

Archana Banage

सोलापुरात आणखी एकास कोरोनाची लागण, 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

Tousif Mujawar

बेळगावच्या शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये अत्याचार

mithun mane