Tarun Bharat

पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघातही सत्तापरिवर्तन

राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या पॅनेलची सरशी, भाजपाला धक्का

 पिंपरी / प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांच्या ‘आपला महासंघ’ पॅनलने दणदणीत विजय मिळवित सत्तापरिवर्तन घडविले. तब्बल 15 वर्षे एकहाती वर्चस्व राखलेल्या बबन झिंजुर्डे यांच्या स्व. शंकर गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवाचा झटका बसला आहे. या पराभवामुळे झिंजुर्डे यांचे कर्मचारी महासंघावरील वर्चस्वही संपुष्टात आले आहे. दरम्यान, या निकालाने अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीने भाजपाला धक्का दिल्याचे मानले जात आहे.

आपला महासंघाचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी घोषित केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत पाचशेहून अधिकच्या फरकाने सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह आठ पदाधिकारी तर 13 कार्यकारणी सदस्यांचा समावेश आहे. कर्मचारी महासंघ पॅनलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या बबन झिंजुर्डे यांचा प्रतिस्पर्धी अंबर चिंचवडे यांनी पराभव केला. तर रणजित भोसले हेही कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले.

दरम्यान, शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीही पहावयास मिळाली. आपला महासंघाच्या अंबर चिंचवडे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱयांनी उघड पाठिंबा देत प्रचारही केला होता. तर बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलला भाजपाच्या दोन्ही आमदारांसह महापालिकेतील पदाधिकाऱयांनी साथ दिली होती. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱयांनी झिंजुर्डे यांच्या पॅनलचा उघड-उघड प्रचारही केला होता. अंबर चिंचवडे यांचा पॅनल विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणाही मध्यरात्री देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा निकाल दोन वर्षांनी होणाऱया महापालिका सभेची चुणूक असल्याचे बोलले जात आहे.

कर्मचाऱयांनी एकधिकारशाही संपविली : चिंचवडे

महापालिका कर्मचारी महासंघात बबन झिंजुर्डे यांची एकधिकारशाही होती. त्यांच्याविरोधात कर्मचाऱयांमध्ये असंतोष होता तोच निकालाद्वारे बाहेर पडला आणि महासंघातील एकधिकारशाही संपुष्टात आली, अशी प्रतिक्रिया विजयानंतर अंबर चिंचवडे यांनी दिली.

Related Stories

कुर्डुवाडीत कोविड १९ ची चाचणी केल्याशिवाय दुकान उघडण्यास मज्जाव

Archana Banage

Solapur : लिंबीचिंचोळीजवळ आराम बस उलटून एक ठार सहा जखमी

Abhijeet Khandekar

सोलापूर : संचारबंदी उल्लंघनप्रकरणी किराणा व कापड दुकानदारावर गुन्हे दाखल

Archana Banage

सोलापूर : जमत असेल तर काम करा, अन्यथा सोडून द्या – जिल्हा आरोग्य अधिकारी

Archana Banage

“त्या दिवशी डॉक्टर नसते तर आमचं बाळ दगावले असते”

Archana Banage

कोरोनाच्या उपाययोजनेसाठी विठोबा धावला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीची मदत

Archana Banage
error: Content is protected !!