Tarun Bharat

पिकअपचा पंक्चर काढताना कारची जोरदार धडक

नागेवाडी फाटय़ावर अपघातात युवक जागीच ठार

प्रतिनिधी/ सातारा

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटय़ावर एका पिकअपला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. समाधान मोहन कांबळे (वय 28, रा. उमरगा, लातूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कारने एवढी जोरात धडक दिली होती की मृत्यू झालेल्या युवकाचे अवयव विखुरले गेले होते. तसेच कारचे आणि पिकअपचे नुकसान झाले होते. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे कर्मचारी पोहोचले होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा येथे बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. साताऱयाकडून पुण्याकडे निघालेल्या पिकअप क्र. एमएच 12 एसएफ 5833 चा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे गाडीतील काहीजण टायरचा पंक्चर काढत होते. त्याच दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार एमएच 12 जीव्ही 3515 ने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की पिकअप गाडीचा चाक काढणाऱयापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसराही गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा झालेला होता. वाहतुकीची कोंडी झाली होती. सातारा तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच लगेच घटनास्थळी पोलीस पोहचले. वाहतूक सुरळीत केली अन् जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

Related Stories

कोविड बाधित ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

शहरात विकेंड लॉकडाऊनला हॉकर्स धारकांचा कोलदांडा

Patil_p

वणवे विझवण्यासाठी कास पठार वनसमीतीच्या कर्मचायांसोबतच सरसावल्या वनरागीणी

Patil_p

सातारा : तर या कामाला अजून उभारी मिळेल… -जिल्हाधिकारी

Archana Banage

छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता फटकारले

Omkar B

रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपारीच्या रडारवर

Patil_p