Tarun Bharat

पिरनवाडी येथील उरुसाला जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी

विविध अटींचे पालन करण्याची यात्रा कमिटीला सूचना

बेळगावः पिरनवाडी येथील उरुसाला प्रशासनाकडून विविध अटींसह परवानगी देण्यात आली आहे. येथील जंगलीपीर दर्ग्याचा उरुस बुधवार दि. 23 ते 27 पर्यंत होणार आहे. येथील उरुस कमिटीने जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर उरुस भरविण्यासाठी परवानगी मागितली होती.

यात्रा कमिटीने कोरोनाचे नियम लागू करून प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक व गर्दी करू नये, अशा अटींवर सदर उरुसाला जिल्हाधिकाऱयांनी परवाना दिली आहे. सदर परवान्याची प्रत यात्रा कमिटीकडे रविवारी सुपूर्द करण्यात आली. यावेळी रफीक मुजावर, इम्तियाज मुजावर, अब्दुल मुजावर, इर्षाद मुजावर, अकबर मुजावर, मुन्ना नभीवाले, अब्दुल लतीफ मुजावर, उमार मुजावर, अन्सार हुबळीवाले व दर्गा कमिटी उपस्थित होती.

Related Stories

‘तो’ कलंडलेला वीजखाब केला सरळ

Amit Kulkarni

विवाह सोहळय़ावेळी दिला कर्तव्य निधी

Patil_p

नीना, गदग स्पोर्ट्स अकादमी, इंडियन बॉईज संघ विजयी

Amit Kulkarni

पुढील विधानसभा निवडणूकही येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली

Patil_p

येळ्ळूर-हलगा भागात आज वीजपुरवठा खंडित

Patil_p

दोन महिलांचा भीषण खून

Patil_p