Tarun Bharat

पिरेगाळी मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

जोयडा : एस.डी.पी. फंडातून पिरेगाळी (ता. जोयडा) गावच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 45 लाख रुपये मंजूर करून रस्ताकामाचे भूमिपूजन जिल्हा पंचायत सदस्य संजय हणबर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोयडा ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित होते.

यावेळी जि. पं. सदस्य संजय हणबर म्हणाले, गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 ए पासून पिरेगाळी गाव दीड कि. मी. अंतरावर आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह आपण या भागाचे आमदार व माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्याकडे केली होती. आर. व्ही. देशपांडे यांनी एसडीपी फंडांतर्गत तातडीने 45 लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे पिरेगाळी जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जोयडा ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित म्हणाले, जोयडा तालुक्यात रस्त्यांच्या विकासामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. तालुक्यात रिसॉर्ट व होमस्टे यांची संख्या वाढल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे, असे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कल्लाप्पा हणबर, रुक्माण्णा हणबर, नामदेव पवार व शंकर हणबर आदी उपस्थित होते.

Related Stories

जलवाहिनीला गळती लागल्याने शहर परिसरात पाणीपुरवठा ठप्प

Amit Kulkarni

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

Amit Kulkarni

रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये होणार वाढ

Amit Kulkarni

दहावीचा निकाल आज

Amit Kulkarni

16 फेब्रुवारीपासून करता येणार जोधपूर विमान प्रवास

Amit Kulkarni

टर्फ मैदान कराराचा चेंडू सदर्न कमांडकडे

Amit Kulkarni