Tarun Bharat

पिळगाव चामुंडेश्वरी देवस्थानात आजपासून नवरात्रोत्सव

प्रतिनिधी /म्हापसा

वरगाव पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी देवस्थानात शारदीय नवरात्रारंभ (घटस्थापना) आज दि. 7 ते 14 पर्यंत मखरोत्सव साजरा होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिली आहे.

यानिमित्त आज गुरुवार दि. 7 ते शुक्रवार दि. 14 पर्यंत दररोज सकाळी जगदंबा चामुंडेश्वरी देवीस महाअभिषेक, महापूजा, पाठ वाचन, सायं. 7 वा. पुराण वाचन, सायं. 7.30 वा. गोव्यातील युवा कीर्तनकारांतर्फे सुश्राव्य कीर्तन, रात्री 9.30 वा. घुमटाच्या तालावर श्री जगदंबा श्री चामुंडेश्वरी देवीचे मखरोत्सव होईल. कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे सर्व सरकारचे नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तुषार टोपले यांनी केले आहे.

Related Stories

पर्वरीतील डीएड कॉलेज समोरील महामार्गावर सिग्नलची गरज

Omkar B

वाळपई नगरपालिकेसाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी वावरावे

Patil_p

मालकाला 2.62 लाखांना गंडवले

Patil_p

”तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्रवादी गोमंतकची युती कायम”

Abhijeet Khandekar

गोवा डेअरीच्या व्यवस्थापिका राधिका काळेंविरुद्ध आरोपपत्र

tarunbharat
error: Content is protected !!