Tarun Bharat

पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे

अजित देवमोरे यांची तहसीलदार प्रदिप उबाळे यांच्याकडे मागणी

वाताहर / कुंभोज

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील ग्रामपंचायत सदस्य व हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष अजित देवमोरे यांनी हातकणंगलेचे तहसीलदार प्रदिप उबाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे तसेच सन २०१३ नंतरच्या केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना दरमहा धान्य मिळत नाही. त्यांचे रेशनकार्ड ” क ” वर्गात गेलेले आहे. शोधमोहिमेत, विभक्तीकरणात तसेच ऑनलाईन लिंक झालेले नाही. अशा प्रकारची कारणे सांगितली जातात. हातकणंगले तालुक्यात पिवळे रेशनकार्ड धारकांची संख्या ४९९२ इतकी आहे.

तसेच केशरी रेशनकार्ड धारकांची संख्या ६२ हजार ७२० इतकी आहे. तरी या रेशन कार्डधारकांच्यातील सुद्धा रेशनकार्डातील कुटुंब सदस्य संख्येप्रमाणे धान्य मिळत नाही ते त्वरित ऑनलाईन लिंक करून त्यांना देणे गरजेचे आहे. तसेच उर्वरित केशरी कार्ड धारकांची संख्या ४० हजार २७२ अशी असून सुद्धा त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा काहीच लाभ मिळत नसून त्यांनाही त्यांच्या हक्काचे धान्य दरमहा नियमितपणे मिळायला पाहिजे अशी तरतूद शासन दरबारी व्हावी व या उपेक्षितांना त्यांच्या हक्काचे रेशन धान्य मिळायला हवे अशी हातकणंगले तालुक्यातील सर्व रेशनकार्ड धारकांची मागणी आहे.

याविषयी आपण येत्या पंधरा दिवसात दिलेल्या मागण्यांचे समाधानकारक निरसन करावे अन्यथा लोकशाही पद्धतीने जनआंदोलन उभे करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष व कुंभोज ग्रामपंचायतीचे सदस्य अजित देवमोरे यांनी दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात अजित देवमोरे , अमरजित बंडगर, त्रिगुण पांडव , मोहसीन सुतार , बंडा पुजारी , किरण कांबळे , रावसाहेब निर्मळे आदी उपस्थित होते.

Related Stories

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज बंद; जाणून घ्या,नेमके काय घडले

Archana Banage

हुपरीत जैन मंदिर जीर्णोद्धारात आढळल्या ९०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन प्रतिमा

Archana Banage

बस चालवल्या प्रकरणी जयंतरावांवर गुन्हा दाखल करा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी 24 तासांत 8 नवे रूग्ण

Archana Banage

गांजा नशाबाजाकडून कबनुरात दोघांवर सशस्त्र हल्ला

Archana Banage

Kolhapur; टोल व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने किणी ग्रामपंचायतीकडून टाळे

Abhijeet Khandekar