Tarun Bharat

पिस्टलसह गावटी कट्टा हस्तगत

Advertisements

प्रतिनिधी/ कराड

कराड तालुक्यात बेकायदा शस्त्र तस्करी सुरूच आहे. कोपर्डे हवेली येथे बेकायदा पिस्टल व गावठी कट्टा विकायला आलेल्या संशयितास कराड ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून पकडले. कोपर्डे येथील रेल्वे गेट परिसरात संशयिताच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून पिस्टलसह गावटी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा 1 लाख 24 हजारांची शस्त्रs हस्तगत करण्यात आला. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात एक संशयित पिस्टलसह गावटी कट्टा, जिवंत काडतुसे विकायला आला होता. कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना याची माहिती मिळाली. कराड- मसूर रोडवर कोपर्डे हवेलीतील रेल्वे फाटकाजवळ संशयित येणार असल्याची खात्री झालल्यावर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी त्या ठिकाणी दबा धरून बसत संशयितावर नजर ठेवली. जर्कीन व काळ्या रंगाची पॅंट असा पेहराव केलेला संशयित दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कंबरेला डाव्या बाजूस  एक देशी बनावटीचे स्टीलचे पिस्टल त्यास लाकडाच्या चॉकलेटी रंगाचा बट कव्हर अडकवलेले आढळून आले. तर उजव्या बाजूला लोखंडी मॅग्झीनसह व एक देशी बनावटीचा धातूचा गावठी कट्टा लाकडाची चॉकलेटी रंगाची मुठ असलेला सापडला.  खिशात  दोन  जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. संशयिताकडे कसून चौकशी सुरू असून त्याचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे. तो नेमके कोणाला ही शस्त्रs विकायला आला होता याचा तपास पोलीस करत असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.  गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करत असून त्याने कोठून ग्नशस्त्रs आणली व कोणाला विक्री करणार होता, याचा तपास करण्यात येत आहे. संशयिताला न्यायालयासमोर उभे केले असता त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी सहभाग घेतला.

Related Stories

“आम्ही काय रेमडेसिवीर पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का?”

Abhijeet Shinde

मिनीबस नदीत कोसळली; 5 ठार

Patil_p

बहिणीशी प्रेम संबंधाच्या संशयावरून पाडगावच्या युवकाचा खून

Patil_p

तौक्ते नुकसानग्रस्तांना वाढीव मदत 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर-विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

बेवारस वाहनांचा होणार लिलाव

datta jadhav

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p
error: Content is protected !!