Tarun Bharat

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पंजाब नॅशनल बंक घोटाळ्याप्रकरणातील मुख्य फरार आरोपी मेहूल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिगामध्ये मेहुल चोकसी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो डोमिनिकामधील क्रिमिनिल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (सीआईडी) च्या ताब्यात आहे. अँटीगुआतील पोलीस डोमिनिका पोलिसांच्या संपर्कात आहेत. मेहुल चोकसीला अटक केल्याचा दावा अँटीगुआमधीली माध्यमांनी केला आहे. यापूर्वी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरिबियन बेटावरुन बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. 

Advertisements


14 हजार कोटींच्या पीएम घोटाळ्याप्रकरणातील फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकाच्या सीआयडीने पडकले आहे. मेहुल चोक्सी अँटिगामध्ये वास्तव्यास होता. पण अँटिगाच्या मीडिया वृत्तानुसार गेल्या रविवारपासून मेहूल चोक्सी बेपत्ता होता. तो फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्या आधीच डॉमिनिकामधून त्याला बेड्या घातल्या आहेत. अँटिगा पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्याचे काम सुरू झाले आहे.


मेहुल चोक्सीच्या वकिलांने दावा केला आहे, त्याचे क्लाईंड अँटिगाचे नागरिक आहेत. अशा परिस्थिती त्याला येथील लोकांना मिळणारे सर्व हक्क प्राप्त आहेत. अँटिगा एक कॅरेबियन देश आहे. मेहुल चोक्सीला ज्या देशातून पकडण्यात आले, तो अँटिगाच्या बाजूला देश आहे. पण मेहुल चोक्सीचा डॉमिनिकामध्ये जाण्याचा मागचा नेमक उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर काही अधिकाऱ्यांसोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या नीरव मोदी लंडनच्या जेलमध्ये असून दोघांविरोधात सीबीआय तपास करत आहे.

Related Stories

दीपिकाने दिली ड्रग्ज चॅटची कबुली; सारा, श्रद्धाची चौकशी सुरु

Rohan_P

भारताची प्रतीमा मलीन करण्याचा मुस्लीम ब्रदरहुडचा कट

Patil_p

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंच्या अटकेची शक्यता”

Abhijeet Shinde

काँगेसचे प्रभावशाली नेते आर. पी. एन. सिंग भाजपमध्ये

Patil_p

घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, दीपाली सय्यदचा राज ठाकरेंवर निशाणा

datta jadhav

शोपियान चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

Patil_p
error: Content is protected !!