Tarun Bharat

पीएफआयवर पुन्हा धडक कारवाई

8 राज्यांमधील 40 स्थानी धाडी, 247 जणांना अटक, अनेक कागदपत्रे हस्तगत 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने पुन्हा धडक कारवाई केली आहे. राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारण (एनआयए) आणि प्रवर्तन संचालनालय (ईडी) यांनी मंगळवारी सकाळपासूनच संयुक्तरित्या ही कारवाई केली. कर्नाटक आणि महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये 40 स्थानी धाडी घालण्यात आल्या असून पीएफआयच्या 247 हस्तकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका आठवडय़ाभरात ही या संघटनेवरील दुसरी व्यापक कारवाई आहे.

गेल्या गुरुवारी टाकण्यात आलेल्या पहिल्या धाडसत्रात अनेक प्रक्षोभक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यावेळी अनेक हस्तकांनाही अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांच्याकडून मिळालेल्या महत्वाच्या माहितीवरुन हे दुसरे धाडसत्र हाती घेण्यात आले. मागच्या धाडत्रात 108 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी ही संख्या त्याच्या दुपटीहून अधिक आहे. नव्या धाडींमध्ये अटक केलेल्यांना नियमानुसार न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येत असून त्यांची कोठडी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आसाम आणि उत्तर प्रदेश

आसाम राज्यात आठ जिल्हय़ांमध्ये ही कारवाई करण्यात आली. गोलपारा, कामरुप, बारपेटा, धुब्री, बागसा, दारांग आणि करीमगंज येथील पीएफआय कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या असून 21 हस्तकांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही सियाना, सारुरपूर आणि सिसरी गेट या मेरठ जिल्हय़ातील तीन स्थानी पहाटेपासूनच धाडी घालण्यात आल्या. सहा पीएफआय समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे बुलंदशहर आणि सीतापूर या जिल्हय़ांमधूनही अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीतही धाडी

दिल्लीतील शाहीनबाग आणि जामिया या मुस्लीमबहुल भागांमध्ये अनेक स्थानांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या. याकामी एनआयए आणि ईडीला दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाचे साहाय्य मिळाले. धाडींमधून 24 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून महत्वाची साधने जप्त करण्यात आली असून त्यांच्या सखोल चौकशीनंतर आणखी बऱयाच कारस्थानांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

हस्तकांच्या घरांवर धाडी

पीएफआयच्या अनेक हस्तकांच्या आणि महत्वाच्या नेत्यांच्या घरांवरही धाडी घालण्यात आल्या आहेत. या घरांमधूनही अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. काही कागदपत्रे प्रक्षोभक मजकुराने भरलेली असल्याची सूत्रांची माहिती आहे. संघटनेच्या क्रूर कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी ही माहिती एनआयएला मिळाली आहे. तिचा अभ्यास सुरु आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

देशद्रोही कारवाया

पीएफआय ही संघटना देशात बेकायदेशीर धर्मांतरे घडविणे, धर्माधर्मांमध्ये फूट पाडणे, मुस्लीम तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करणे, प्रक्षोभक वक्तव्यांच्या माध्यमातून लोकांची माथी भडकाविणे आदी कृत्ये करीत असल्याची माहिती गुप्तचरांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्याची योजना सज्ज करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतात हिंसाचार घडवून प्रशासनावर दबाव आणण्याचीही या संघटनेची योजना होती, अशी चर्चा आहे.

भारताच्या इस्लामीकरणाचे कारस्थान

येत्या 25 वर्षांमध्ये भारताच्या इस्लामीकरणाचे ध्येय संघटनेने समोर ठेवले आहे, असे दर्शविणारी कागदपत्रे संस्थेच्या कार्यालयांमध्ये तसेच हस्तकांजवळ सापडल्याचे प्रतिपादन एनआयएने केला आहे. या कागदपत्रांवरुन या संघटनेच्या अंतःस्थ कुटील हेतूचा परिचय होत आहे. ही संघटना हे ध्येय कसे पूर्ण करणार होती यासंबंधी आता अटक केलेल्यांच्या चौकशीतून माहिती मिळविली जाणार आहे.

Related Stories

Modi Birthday : पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Archana Banage

पंजाबमध्ये तैनात होणार एस-400

Patil_p

शेअर बाजारात पुन्हा ‘ब्लॅक मंडे’

Patil_p

भारत-चीन सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता

datta jadhav

कर्नाटकात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

Archana Banage

हरिद्वारमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह

Amit Kulkarni