Tarun Bharat

पीएमओ अन् महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येच हेरगिरी

चिनी हेरगिरी रॅकेटचा भांडाफोड : चौकशीत महत्त्वाचा खुलासा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतातील चिनी हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पंतप्रधान कार्यालयासह दलाई लामा आणि भारतात वापरण्यात येत असलेली सुरक्षा उपकरणेही चिनी हेरांच्या निशाण्यावर होती. चीनने भारतातील स्वतःच्या हेरांना पीएमओसह मोठय़ा कार्यालयांमधील अंतर्गत माहिती देण्यास सांगितले होते. कार्यालयात कुठला व्यक्ती महत्त्वाचा आहे, कोण कुठल्या पदावर आहे आणि किती प्रभावशाली आहे याची माहिती जमविण्याचा निर्देश होता असे चिनी हेर क्विंग शी याने चौकशीदरम्यान म्हटले आहे.

चीनच्या हेरगिरीच्या जाळय़ात महाबोधी मंदिरातील बौद्ध भिक्षू आणि कोलकात्यातील महिला सामील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. क्विंग शी याची या महिलेची भेट करून देण्यात आली होती. ही महिला महत्त्वाचे दस्तऐवज सोपवित होती. क्विंग त्यांचे भाषांतर करून ते चीनला पाठवत होता.

पत्रकारासह 3 जण अटकेत

याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने मागील महिन्यात क्विंग शी याच्यासह नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा याला अटक केली होती. 

Related Stories

वाहन परवाना 31 मार्च पर्यंत वैध

Patil_p

अवघ्या 5 हजारात रुग्णसाहाय्य यंत्रणा

Patil_p

Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात २१ ‘समविचारी’ पक्षांना आमंत्रित

Abhijeet Khandekar

अनिल देशमुख 13 महिन्यांनी तुरुंगाबाहेर; स्वागतासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आर्थर रोडवर जेलबाहेर

Abhijeet Khandekar

डेल्टा प्लसवरही कोव्हॅक्सिन प्रभावी

Patil_p

मागील 24 तासात देशात 37,154 नवे कोरोना बाधित; 724 मृत्यू

Tousif Mujawar