Tarun Bharat

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

Advertisements

मुंबई \ ऑनलाईन टीम

पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा, असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी पीएम केअर माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या खराब व्हेंटिलेटरबाबत केंद्र सरकारच्या वकिलाला पुरवठादारावर कारवाई करवाई करुन माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने घेतलेल्या माहितीनुसार असे प्राप्त झाले आहे की, पीएम केअर फंडच्या माध्यमातून मिळालेले ११३ व्हेंटिलेटर हे खासगी आणि शासकीय रुग्णालायत वापरण्यात आले तेव्हा निकामी असल्याचे आढळले आहे. तर ३७ व्हेंटिलेटर हे अजूनही वापरण्यात आले नसल्यामुळे त्यांची स्थिती कळाली नाही आहे.

Related Stories

satara; कोयनेच्या काठावर भूकंपाचे सौम्य धक्के, व्यवस्थापनाकडून दुजोरा

Rahul Gadkar

उद्धव ठाकरे विश्वासघातकी

Patil_p

म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत विक्रमी वाढ

Patil_p

‘जिओ’चा 10 वा मोठा करार; दोन कंपन्यांनी केली 6441.3 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,309 नवे कोरोना रुग्ण; 334 मृत्यू

Rohan_P

शिराळातील पणूंब्रे वारुण येथे साकारतेय वीरगळ स्मारक!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!