Tarun Bharat

‘पीएम केअर फंड’च्या वापरासंबंधी याचिका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पीएम केअर्स फंडाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील विप्लव शर्मा यांनी ही याचिका दाखल केली असून निधीच्या वापरासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. आता न्यायालय त्यासंबंधी काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीएम केअर फंडातील निधीचा वापर केवळ कोरोनाच्या लस खरेदी करण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लान्ट निर्मिती व वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या संकटकाळात सर्व राज्यांमधील खासदार-आमदारांनाही आपला निधी पूर्ण पारदर्शीपणे मतदारसंघात वापरण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही या याचिकेतून करण्यात आली आहे. यापूर्वी पीएम केअर्स फंडाबाबत दिल्ली उच्च न्यायालयातही एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तसेच आरटीआय अंतर्गत पीएम केअर्स फंडाला पब्लिक ऍथोरिटी म्हणून घोषित करण्याची मागणीही दिल्ली उच्च न्यायालयात दोन याचिकांमधून करण्यात आली आहे.

Related Stories

अजमलसोबत बसणारे घुसखोरी कशी रोखणार?

Amit Kulkarni

धोका वाढला : उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 49 हजार

Tousif Mujawar

भारतीय विद्यार्थ्याला नासाच्या स्पर्धेत विजेतेपद

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्येत देशात घट कायम

Patil_p

सोनिया गांधींनी बोलावली आज विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक ; मुख्यमंत्री ठाकरे राहणार उपस्थित

Archana Banage

ब्रिटनमधील लॉर्ड मेघनाद देसाई यांचा मजूर पक्षाला रामराम

Patil_p