Tarun Bharat

पीएम मोदींनी ‘मन की बात’मधून साधला महाराष्ट्रातील डॉ. शंशाक जोशी यांच्याशी संवाद

मुंबई \ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लोकांच्या मनातील काही शंका उपस्थित केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डॉ. शशांक जोशी यांना पहिला प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. यामध्ये मुंबईतील डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं. कोरोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी?,असा प्रश्न मोदींनी केला.

डॉ. शशांक जोशी यांचे उत्तर

या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शशांक जोशी म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोकं घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डॉ. शशांक जोशी यांना दुसरा प्रश्न

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी डॉ. शशांक जोशी यांना दुसरा प्रश्न विचारला. ‘मला अनेक पत्र मिळाली आहेत. उपचारांविषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. काही औषधांची मागणीही खूप होत आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की, कोरोनाच्या उपचाराविषयीही आपण लोकांना माहिती द्यावी.

डॉ. शशांक जोशी यांचे उत्तर


या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शशांक जोशी म्हणाले, कोरोनाचा उपचार लोक खूप उशिराने सुरू करतात. आजार अंगावर काढतात. त्याचबरोबर मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात. लोकांनी सरकारच्या सूचनांचं पालन केलं, तर कठिण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत नाही. कोरोनावर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. हलका, मध्यम आणि तीव्र कोरोना. हलका स्वरूपातील लक्षणं असलेल्यांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध्यम व तीव्र कोरोना असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. स्वस्तातील औषधं उपलब्ध आहेत. मात्र, सध्या चाचण्यांमध्ये असलेल्या रेमडेसिवीरची चर्चा होत आहे. यामुळे एक गोष्ट होते की रुग्णाला रुग्णालयात दोन तीन दिवस कमी राहावं लागतं. तब्येत सुधारण्यास मदत होते. पण, सुरूवातीच्या दिवसांमध्ये हे औषध दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधरण्यास मदत होते. लोकांनी सोशल मीडियावरील माहितीवर विश्वासू ठेवू नये. लोकांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. महागड्या औषधांमागे लागण्यात काही अर्थ नाही. काही भ्रम लोकांमध्ये तयार झालेले आहेत, तेम्हणाले.

या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे माहिती दिल्याबद्दल आभार मानले.

Related Stories

दिया मिर्झा विवाहाच्या बेडीत

Patil_p

माँटे कार्लो स्पर्धेतून थिएम, बेरेटिनीची माघार

Patil_p

पतंजलीच्या कोरोनावरील औषधाची चाचणी सुरू

Patil_p

विजय माल्ल्याच्या संपत्तीचा होणार लिलाव

prashant_c

कोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

datta jadhav

अमेरिकेनेपुरविले 100 व्हेंटिलेटर्स

Patil_p