Tarun Bharat

पीएसजीच्या विजयामध्ये नेमारचे दोन गोल

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

बुधवारी झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात पॅरीस सेंट जर्मेन संघाने (पीएसजी) मँचेस्टर युनायटेडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. पीएसजीच्या विजयामध्ये नेमारने दोन गोल नोंदविले.

या स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी या दोन्ही संघांनाही यापुढेही प्रयत्न करावे लागतील. दरम्यान बुधवारच्या सामन्यातील पराभवानंतरही मँचेस्टर युनायटेड संघाचे स्पर्धेतून बाहेर पडण्याची संधी थोडक्यात हुकली. आता च गटात पीएसजी संघ भक्कम स्थितीत असला तरी प्रेंच चॅम्पियन्स मँचेस्टर युनायटेड आणि आर बी लिपझिग हे प्रत्येकी 9 गुणांवर आहेत. आता पीएसजीचा पुढील सामना इस्तंबुल बसाकसेहरशी होणार असून मँचेस्टर युनायटेडला पुढील सामन्यासाठी जर्मनीत प्रयाण करावे लागेल.

बुधवारच्या सामन्यात नेमारने पीएसजीचे खाते पूर्वार्धात उघडल्यानंतर रेसफोर्डने मँचेस्टर युनायटेडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पीएसजीचा दुसरा गोल मारक्युनोसने नोंदविला. त्यानंतर नेमारने पीएसजीचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून मँचेस्टर युनायटेडचे आव्हान संपुष्टात आणले. बुधवारी झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात लिपझिगने इस्तंबुल बसाकसेहरवर 4-3 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला.

Related Stories

इंग्लीश महिला फुटबॉल हंगाम समाप्तीची घोषणा

Patil_p

स्टॉकहोम टेनिस स्पर्धेत टॉमी पॉल विजेता

Patil_p

भारताला आज विजयाची गरज

Patil_p

महिला टेनिसपटूंच्या मानांकनात बार्टी आघाडीवर

Patil_p

बांगलादेशचा टी-20 महिला संघ जाहीर

Patil_p

विश्व सांघिक टेनिस स्पर्धेला प्रारंभ

Patil_p