बार्शी / प्रतिनिधी
सध्या खरिपाचा हंगाम चालू असून या खरिपाच्या हंगामामध्ये बार्शी तालुक्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे त्यानुसार काम चालू असून आतापर्यंत 3945 शेतकऱ्यांना 19 कोटी 53 लाख इतके पीक कर्ज वाटप झाले आहे. बाकी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ आणि सोप्या पद्धतीत मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामुळे बार्शी तालुक्यातील पीककर्जापासून शेतकरी वंचित राहणार नाही ही अशी प्रतिक्रिया बार्शी सहाय्यक निबंधक अभयकुमार कटके यांनी दैनिक तरुण भारत संवादशी बोलताना दिली.
याविषयी अधिक बोलताना , कटके यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बँकेपर्यंत येऊ नये अशी आम्ही काळजी घेतली असून शासनाच्या वतीने ऑनलाईन पीक कर्जाचा अर्ज भरण्याची सोयाआहे. आणि ज्यांना ऑनलाइन कर्जाचा अर्ज भरता येत नाही , अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सोसायटीला असणाऱ्या गट सचिवाकडे कर्जाचा अर्ज दिला तरी चालेल तसेच कर्जाचा अर्ज आपल्या गटसचिव यांचे कडे उपलब्ध आहेत. फक्त शेतकऱ्यांनी आपला उतारा सातबारा ,फेरफार 8 अ, 6ड, आधार कार्ड आणि आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाची तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र कागदपत्रे घेऊन सचिवाकडे अर्ज भरावयाचा आहे. ते सर्व अर्ज गट सचिव राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करेल आणि मंजुरीनंतर फक्त एकच दिवस शेतकऱ्याला सह्यांसाठी बँकेत यावे लागेल, असे नियोजन आम्ही केले आहे.
तर आमच्याकडे तक्रार करा–
कोरोना काळामध्ये शेतकरीवर्ग आर्थिक अडचणी मध्ये सापडला असून शेतकरी वर्गास दिलासा मिळावा म्हणून आपल्या गावातून गटसचिव यांना पीक कर्जाची अर्ज भरण्यास सांगितले आहे . अर्ज भरताना एखादा गटसचिव किंवा इतर व्यक्ती कोणी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार आमच्या कार्यालयाकडे करावी आणि जर कोणती बँक शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असेल तर त्याचीही तक्रार आमच्या कार्यालयाकडे करावी.
.


previous post
next post