Tarun Bharat

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

प्रतिनिधी / वाठार किरोली

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकारमंत्री पाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Related Stories

वुहानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर

prashant_c

कोरेगावच्या ग्रामसेवकांचा अभिमान वाटतो

Patil_p

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

महाराष्ट्रात एका दिवसात 51,457 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

दुहेरी नागरिकत्वामुळे इम्रान खान यांच्या 4 सल्लागारांना हटवण्याची मागणी

datta jadhav

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मनोज कदम, ऋषिकेश देशमुख

Amit Kulkarni