Tarun Bharat

पीडीओ गणेश यांचा बेंगळूर येथे सन्मान

Advertisements

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्मयात ग्राम पंचायतींमार्फत विविध शासकीय कामे उत्कृष्टरीत्या राबविण्यासाठी तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष व बिडी ग्राम पंचायतीचे अभिवृद्धी अधिकारी के. एस. गणेश यांना कर्नाटक पंचायतराज बेंगळूर परिषदेच्यावतीने डॉ. कोमारीगौडा दत्त प्रशस्ती पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

बेंगळूर येथे दि. 2 रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमांतर्गत त्यांचा सन्मान सोहळा पार पडला. ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी म्हणून  के. एस. गणेश यांनी कार्य करत असताना बिडी ग्राम पंचायतीचा विकास करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. यापूर्वीही अनेक ग्राम पंचायतींमध्ये काम करताना त्यांनी उत्कृष्ट सेवा व प्रामाणिक कार्य केले आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन पंचायतींना सन्मान मिळवून दिला आहे. त्याच पद्धतीने आता बिडी ग्रा.पं.मध्ये त्यांनी केलेल्या प्रामाणिक सेवेची दखल घेऊन डॉ. कोमारीगौडा दत्त प्रशस्ती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

बेंगळूर येथील कर्नाटक पंचायतराज परिषदेच्या भवनात के. एस. गणेश यांचा मानचिन्ह, प्रमाणपत्र व श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. कोमारीगौडा, कार्याध्यक्ष नारायण स्वामी, प्रधान कार्यदशी सतीश आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.    

Related Stories

खानापूर बेळगाव राष्ट्रीय मार्गावरही आता नाकेबंदी

Patil_p

चिकोडी तालुक्यातील तिघांना दुहेरी खूनप्रकरणी फाशीची शिक्षा

Amit Kulkarni

खासबागच्या बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

Amit Kulkarni

बल्लारीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांचे मृतदेह फेकले खड्ड्यात

Abhijeet Shinde

बेकिनकेरेत नागनाथ सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Omkar B

नियमबाहय़ वाहनधारकांवर पोलिसांच्या कारवाईचे सत्र सुरूच

Patil_p
error: Content is protected !!