Tarun Bharat

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती स्थानबद्ध

युथ कन्व्हेंशनपूर्वी घरातच कैद : कोरोनासंबंधी नियमांचे दिले कारण

वृत्तसंस्था/श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना श्रीनगरच्या गुपकार रोड येथील त्यांच्या निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले आहे. याचबरोबर पीडीपी कार्यालयाला पोलिसांनी सील केले आहे.

पीडीपीच्या युथ कन्व्हेंशनचे रविवारी आयोजन होणार होते. परंतु तत्पूर्वीच जम्मू-काश्मीर प्रशासनाने कोरोना निर्बंधांचा दाखला देत कठोर भूमिका घेतली आहे.

कोरोनाचे निमित्त पुढे करून सरकार आमचा आवाज दडपू पाहत आहे. तरुणांना घरातून बाहेर पडण्यापासून आणि राजकारणात उतरण्यापासून रोखण्यासाठी नव्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत असा आरोप मुफ्तींनी केला आहे.

 पीडीपीच्या निर्धारत कार्यक्रमाचे आयोजन होऊ नये म्हणून गुपकार येथे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याचा दावा पीडीपी प्रवक्ते नाजमू साकिब यांनी केला आहे. पीडीपीकडून मागील काही दिवसांपासून युथ कन्व्हेंशनच्या आयोजनाची तयारी केली जात होती.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्याच्या सुमारे 2 वर्षांनी काश्मीरमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मागील एक-दोन महिन्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपी यासारखे पक्ष जम्मू-काश्मीरच्या विविध भागांमध्ये पक्षाच्या बैठकांचे आयोजन करत आहेत.

Related Stories

प्रभु राम त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत : संजय राउत

Rahul Gadkar

उद्योगपती आनंद महिंद्रा आता ‘वैद्यकीय’ क्षेत्रात

Patil_p

आसाममध्ये मतदारसंघांचे होणार परिसीमन

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’(29)

Patil_p

फरिदाबादमध्ये घरातून 1 कोटींची रोकड जप्त

Patil_p

प्रेमिकांना संरक्षण देणारे मंदिर

Patil_p