Tarun Bharat

पीपीई किट निर्यातीवरील बंदी हटविण्याची एईपीसीची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात नियमितपणे सध्या आठ लाख पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किटची निर्मिती केली जात आहे. यामुळे सरकारने पीपीई किटच्या निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा आग्रह इंडियन ऍपरल एक्स्पोर्ट इंडस्ट्री संघटना (एईपीसी) यांनी केला आहे.

देशातील निर्यातक जागतिक बाजारात महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची तयारी एईपीसीने ठेवली असल्याचा विश्वास अध्यक्ष ए शक्तिवेल यांनी व्यक्त केला आहे. जागतिक पीपीई किट बाजारामध्ये देशातील कंपन्यांवर निर्यात अवलंबून असणार आहे. पीपीईची जागतिक निर्यात आगामी पाच वर्षात 60 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होणार असल्याचा अंदाजही यावेळी व्यक्त केला जात आहे. परंतु सरकारने या निर्यातीवरील बंदी मागे घेण्याची मागणी होत  असून त्याबाबत सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे.

देशाची कामगिरी

उद्योग क्षेत्रात देशभरामधील आपल्या उत्पादनाच्या सुविधांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे नव्याने उत्पादन सुविधा सुरु करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. यांच्यासाठी पीपीई निर्यातीवरील निर्बंध काढून टाकल्यास मोठय़ा प्रमाणात व्यापार विस्ताराला वाव मिळणार असल्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

Related Stories

जागतिक सकारात्मकतेत शेअरबाजार तेजीसह बंद

Patil_p

रिलायन्स रिटेल आता एफएमसीजी बाजारात

Patil_p

नोव्हेंबरमध्येही देशातील विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Omkar B

23 टक्के योगदानासह भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक- पियुष गोयल

Patil_p

5-जी नेटवर्क आणण्यात सर्वात पुढे राहणार ‘एअरटेल’ : सुनील मित्तल

Amit Kulkarni

सलग चौथ्या सत्रातही सेन्सेक्स घसरणीत

Patil_p