Tarun Bharat

पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या मालमोटारीला भीषण आग

सांगली प्रतिनिधी

येथील उत्तर शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या आरसीएच सेंटरसमोर वीज वितरणच्या मुख्य लाईनला स्पर्श झाल्याने पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या भारत गॅस कंपनीच्या आयशर मालमोटारीला भीषण आग लागली. पाठीमागून येणाऱ्या याच कंपनीच्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने संबंधित मालमोटार चालकाला आग लागण्याचे सांगितले. चालकांने तात्काळ गाडी थांबवत गाडीतून उडी मारली. महापालिका अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यानी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आगीत पाईप पूर्णपणे जळून गेल्या. तसेच मालमोटारचेही काही प्रमाणात नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

मुख्यमंत्री ठाकरे मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीला

Archana Banage

राजाभाऊ भेलचे मालक रविंद्र शिंदे यांच्यावर हल्ला

Abhijeet Khandekar

राजस्थानमध्ये एका दिवसात 118 नवे कोरोना रुग्ण; तर 3 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

सांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage

”देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली”

Archana Banage

पदवीचे शिक्षण घेणारा ‘हा’ गँगस्टर आहे कोण?

Archana Banage