Tarun Bharat

पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशरला भीषण आग

Advertisements

सांगली/प्रतिनिधी

उत्तर शिवाजीनगर परिसरातील महापालिकेच्या आरसीएच सेंटर समोर वीज वितरणच्या मुख्य लाईनला स्पर्श झाल्याने पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या भारत गॅस कंपनीच्या आयशर मालमोटारीला भीषण आग लागली. पाठीमागून येणाऱ्या याच कंपनीच्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने संबंधित मालमोटार चालकाला आग लागण्याचे सांगितले. चालकांने तात्काळ गाडी थांबवत गाडीतून उडी मारली. यावेळी महापालिका अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आगीत पाईप पूर्णपणे जळून गेल्या. तसेच मालमोटारचेही काही प्रमाणात नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

कडेगाव तालुक्यात जुगार, मटका जोमात; पोलीस प्रशासन कोमात

Abhijeet Shinde

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँक निवडणुक; सत्तारूढ पॅनल ९ जागांवर आघाडीवर

Abhijeet Shinde

कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे पथक रवाना

Abhijeet Shinde

सांगली : बागणीतील कोविड सेंटर सामान्य लोकांच्या फायद्याचे : पालकमंत्री

Abhijeet Shinde

ताकारी कमळ भैरवचा डोंगर पर्यटकांचे नवे आकर्षण

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना कक्षातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!