Tarun Bharat

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत

बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप :चीनच्य बिंग जिआववर मात

वृत्तसंस्था/ मनिला, फिलिपाईन्स

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या हे बिंग जिआववर मात केली.

कोव्हिड 19 मुळे दोन वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. चौथे मानांकन असलेल्या सिंधूने 2014 मध्ये गिमेचॉन येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. तिने पाचव्या मानांकित चीनच्या हे बिंग जिआववर 21-9, 13-21, 21-19 अशी मात केली. चुरशीची झालेली ही लढत सव्वातास रंगली होती. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सिंधूचे या लढतीआधी जिआवविरुद्धचे रेकॉर्ड 7-9 असे होते. जिआवची कामगिरी सरस असली तरी शेवटच्या दोन सामन्यात सिंधूने तिला हरविले होते. त्यामुळे या लढतीतही सिंधूचे पारडे जड होते.

सिंधूने जोरदार सुरुवात करीत 11-2 अशी झटपट आघाडी घेतली. ब्रेकनंतरदेखील पूर्ण नियंत्रण ठेवत सिंधूने हा गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱया गेममध्ये मात्र जिआवने जोरदार मुसंडी मारत प्रारंभी 6-4 अशी बढत घेतली आणि ब्रेकपर्यंत 11-10 अशी निसटती आघाडी मिळविली. ब्रेकनंतर जिआवने सलग पाच गुण घेत 19-12 अशी मजल मारली आणि हा गेम घेत सिंधूशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱया गेममध्ये प्रारंभी दोघींची 2-2 अशी बरोबरी होती. सिंधूने यानंतर क्रॉसकोर्ट स्मॅशेसचा सढळ वापर करीत गुण मिळविले आणि ब्रेकपर्यंत 11-5 अशी भक्कम आघाडी घेतली. बिंग जिआवने नंतर जोरदार प्रतिकार करीत सिंधू 15-6 असे पुढे असतानाही तिची आघाडी 15-16 अशी कमी केली. नंतर सिंधूचा फटक नेटला लागल्याने बिंगने 18-16 अशी बढत घेतली. मात्र यानंतर सिंधूने एक बॉडी स्मॅश मारल्यानंतर चार मॅचपॉईंट्स मिळविले. जिआवने तीन मॅचपॉईंट्स वाचवले. पण अखेर सिंधूने बाजी मारत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

Related Stories

सौराष्ट्रकडून दिल्लीचा डावाने पराभव

Amit Kulkarni

रोहित शर्मा वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळाडू

Patil_p

स्पेनचा नदाल अंतिम फेरीत

Patil_p

नदालचे पुनरागमन विजयाने, मरेची स्पर्धेतून माघार

Amit Kulkarni

स्पर्धेत उतरण्यापूर्वीच भारताची 21 पदके निश्चित

Patil_p

माजी फुटबॉलपटू, प्रशिक्षक हकिम यांचे निधन

Patil_p