Tarun Bharat

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत पराभूत

वृत्त संस्था/ पॅरीस

प्रेंच खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची टॉप सीडेड तसेच ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. जपानच्या 15 व्या मानांकित सायका ताकाहाशीने सिंधूचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

2013 व 2014 आशियाई स्पर्धेत कांस्य मिळविणाऱया जपानच्या ताकाहाशीने शनिवारी भारताच्या 26 वर्षीय पीव्ही सिंधूचे आव्हान 18-21, 21-16, 21-12 अशा गेम्स्मध्ये संपुष्टात आणले. विद्यमान विश्वविजेत्या सिंधूला गेल्या आठवडय़ात डेन्मार्कमध्ये झालेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती.

सिंधू आणि ताकाहाशी यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले असून त्यापैकी 4 सामन्यात सिंधूला पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यामध्ये सिंधूने आक्रमक स्मॅश फटक्याच्या जोरावर पहिला गेम 21-18 असा जिंकून ताकाहाशीवर आघाडी मिळविली. पण त्यानंतर पुढील दोन गम्स्मध्ये ताकाहाशीचा सिंधूला जेरीस आणले.

ताकाहाशीने दुसरा गेम 21-16 तर शेवटचा गेम  21-12 असा जिंकून  सिंधुचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सिंधूने काही कालावधीसाठी विश्रांती घेतली होती. या विश्रांतीनंतर सिंधूची ही दुसरी स्पर्धा होती. सिंधूने 2016 साली रिओ ऑलिम्पिक रौप्य तर 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविले होते.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा 4 सप्टेंबरपासून

Patil_p

महिला जिम्नॅस्ट ऍशरम निवृत्त

Patil_p

योगिता खेडकरचा नवा राष्ट्रीय विक्रम

Patil_p

विल्यम्सन, टेलर यांची शानदार अर्धशतके

Patil_p

विजयाच्या मोहिमेसाठी आज ईस्ट बंगालची लढत नॉर्थईस्टशी

Patil_p

2008 युवा विश्वचषकात विल्यम्सन लक्षवेधी

Patil_p