Tarun Bharat

पीसी चाको शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केरळमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकलेले ज्येष्ठ नेते पीसी चाको राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता  आहे. चाको आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले असून, ते आपला नवीन राजकीय प्रवास सुरू करू शकतात. 

चाको यांनी म्हटले आहे की, मी शरद पवारांना भेटणार आहे. पक्षाला भेडसावणाऱ्या संकटावर चर्चा करणे गरजेचे आहे. तसेच माझ्या भविष्यातील योजनेवर चर्चा करण्यासाठी मी सीताराम येचुरी आणि जी. एन. आझाद यांचीही भेट घेणार आहे. मी माझी भूमिका पुढे एलडीएफला देईन. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय घेईन. 

चाको हे केरळमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते यापूर्वी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदारही राहिले आहेत. पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी 10 मार्चला काँग्रेसला रामराम ठोकला.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 1.15 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

तैवानच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या युद्धनौका

Patil_p

शाहीस्नानासाठी रेल्वेही सज्ज

Patil_p

वैष्णो देवी मंदिर परिसरात आग

Patil_p

ग्लँड फार्माचा नफा 34 टक्के वाढला

Patil_p

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

Archana Banage
error: Content is protected !!