Tarun Bharat

पी.गुणेश्वरन दुसऱया फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथे सुरू असलेल्या बेंगळूर ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने आगेकूच केली तर रामकुमार रामनाथन व अर्जुन कढे यांच्यासह अन्य भारतीयांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

डावखुऱया गुणेश्वरनने फ्रान्सच्या मथायस बूजचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. रामकुमारने एका सेटची आघाडी घेतली होती. पण ती त्याला राखता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलकडून त्याला 6-3, 0-6, 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. कढेला तुर्कीच्या अल्तुग सेलिकबिलेकने 6-1, 6-2 असे नमवित आगेकूच केली. वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या एसडी प्रज्वल देवलाही बल्गेरियाच्या दिमिटर कुझमानोव्हने 6-2, 6-2 असे हरविले. आणखी एक वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या रिषी रेड्डीलाही फ्रान्सच्या सहाव्या मानांकित एन्झो कुआकॉने 6-1, 6-3 असे हरविले. गुणेश्वरन हा एकमेव भारतीय एकेरीत राहिला असून साकेत मायनेनीही पहिल्या फेरीत पराभूत झाला आहे.

पुरुष दुहेरीत युकी भांब्री व दिविज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तुर्कीच्या सेलिबिलेक व से लिकेल यांनी सामना अर्धवट सोडल्यामुळे त्यांना पुढे चाल मिळाली. त्यावेळी भारतीय जोडी 3-1 अशी पुढे होती.

Related Stories

नजीकच्या भविष्यात देशात क्रीडास्पर्धा अशक्य : रिजीजू

Patil_p

यंदा भरगच्च प्रथमश्रेणी हंगाम – रणजी स्पर्धा 16 नोव्हेंबरपासून

Patil_p

भारताच्या युवा टेनिसपटूचा अपघाती मृत्यू

datta jadhav

बांगलादेश संघात तमीम इक्बालचे पुनरागमन

Patil_p

सर्बियाच्या जोकोविचचा टेनिसमधील नवा विश्वविक्रम

Patil_p

भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामला सुवर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!