Tarun Bharat

पी. चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला मोठा दिलासा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये मोठा दिलासा देण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये दिल्लीतील न्यायालयाकडून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. पी. चिदंबरम हे 2006 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात विदेशी गुंतवणुकीतील हे प्रकरण आहे.

चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी काही व्यक्तींना फायदा करून देण्यासाठी आणि त्यांच्याकडून लाच घेण्याप्रकरणी तसेच त्याबाबत मंजुरी दिल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता. तर पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिंदबरम यांनी FIPB च्या मंजुरीसाठी 305 कोटी रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मात्र, कार्ती आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Related Stories

गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला; 3 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

Tousif Mujawar

खासदार गावितांचा शिंदे गटात प्रवेश नाही- मुख्यमंत्री शिंदे

Archana Banage

‘नेसल’ लसीची चाचणी सुरू

Patil_p

‘पंतप्रधान म्युझियम’चे आज लोकार्पण

Patil_p

भारताची चिंता वाढली; ब्रम्हपुत्रा नदीवर चीन उभारणार धरण

datta jadhav

प्रियंका गांधी आपल्या कुटुंबासहित भारत जोडो यात्रेत सहभागी

Archana Banage
error: Content is protected !!