Tarun Bharat

पी. डी. पाटीलसाहेबांना तालुक्यात अभिवादन

प्रतिनिधी/ कराड

कराड नगरीचे भाग्यविधाते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे शिल्पकार आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांची 103 वी जयंती कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

जयंतीनिमित्त मंगळवार पेठेतील निवासस्थानी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, ऍड. मानसिंगराव पाटील, ए. एन. मुल्ला, रेश्मा कोरे, शोभा पाटील, जयंतकाका पाटील, राजेंद्र माने आदींनी अभिवादन केले.

यावर्षी कोरोना संकटामुळे जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स पाळणे महत्वाचे असल्याने साहेबप्रेमींनी कराडमध्ये न येता आपल्या गावातच अभिवादन करावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले होते. त्यास प्रतिसाद देत कराड उत्तरमधील तसेच दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी व साहेबप्रेमी जनतेने गावातच जयंती साजरी करत अभिवादन केले. यशवंतनगर (ता. कराड) येथील सहय़ाद्रि सहकारी साखर कारखान्यावरही सभासद, कर्मचारी, अधिकारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कराड नगरपरिषदेतील पी. डी. पाटील पुतळय़ास अधिकारी, कर्मचाऱयांनी अभिवादन केले.

Related Stories

सातारा : ‘वाठार किरोलीच्या युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी’

Archana Banage

कोल्हापूर :जिल्हा बंदीचे उल्लंघन करत सहा जणांचा हिंगणगावात प्रवेश

Archana Banage

यंदा प्रथमच धावणार नाही ‘देवाची गाडी’

Archana Banage

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’ला शरद पवारांची हजेरी

Abhijeet Khandekar

तारापूर एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

datta jadhav

रत्नागिरी : मराठी रंगभूमीवरील सुवर्णकाळाला उजाळा मिळणार !

Archana Banage