Tarun Bharat

पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या : वीरप्पा मोईली

बेंगळूर/प्रतिनिधी

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे दिग्गज नेते एम. वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली आहे.

तेलंगणा विधानसभेने मंगळवारी राव यांच्या चालू जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यासाठी ठराव मंजूर केला.

माजी केंद्रीय मंत्री मोईली यांनी पीटीआयशी बोलताना राव हे या पुरस्कारासाठी पात्र आहेत, परंतु सिंग यांचे देशाच्या आर्थिक आघाडीत त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

जेव्हा (राव) यांनी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा (देशाची) अर्थव्यवस्था खालावलेली होती आणि देशाची स्थिती खराब होती. मनमोहनसिंग यांच्यासमवेत राव यांनी अर्थव्यवस्था सुधारल्याचे पाहिले आहे. त्यामुळे त्यांनाही भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा असे म्हंटले आहे.

Related Stories

कर्नाटक: दोन लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

Archana Banage

पोटनिवडणुकीशी सीबीआय कारवाईचा संबंध नाहीः महसूलमंत्री

Archana Banage

KCET साठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात

Archana Banage

युकेहून कर्नाटकात आलेल्या १७५ जणांशी संपर्क नाही

Archana Banage

आजपासून कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करण्याची शक्यता

Archana Banage

ब्लॅक फंगसवरील उपचारासंबंधी मार्गसूची लवकरच

Amit Kulkarni