Tarun Bharat

पी. व्ही. सिंधूचा धमाकेदार विजय, सेमीफायनलमध्ये मिळवली जागा

ऑनलाईन/टीम

पीव्ही सिंधूने रोमहर्षक सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. दरम्यान, पी. व्ही. सिंधूने आपला फॉम कायम राखला आहे. सिंधूने पहिला सेट २१-१३ ने जिंकल्यानंतर दुसरा सेट अटीतटीचा झाला. दुसऱ्या सेटमध्ये २२-२० ने सिंधूने विजय मिळवत सामना जिंकला.

यामागुचीने सिंधूला चुरशीची टक्कर दिली. मात्र सिंधूने अप्रतिम बॅडमिंटन शॉट खेळत पहिला सेट चांगल्या फरकाने जिंकला.
सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

Related Stories

उत्तेजक चाचणीत तरणजीत कौर दोषी

Patil_p

सामना हरला, पण मने जिंकली!

Patil_p

रविवारी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

Patil_p

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Archana Banage

सुरक्षा परिषद : भारताला रशियाचा पाठिंबा

Patil_p

हिमाचलमध्ये दुर्घटनेत 7 ठार

Patil_p