Tarun Bharat

पुंगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वार्ताहर / राशिवडे

पुंगाव (ता. राधानगरी ) येथील एका तरुण शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून दारुच्या नशेत आज सकाळी शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुभाष गणपती बरगे ( वय ४० ) असे त्यांचे नाव आहे.

बरगे हे कर्जबाजारी होते. यातून त्यांना दारुचे व्यसन लागले. आज सकाळी ते वैरण आणायला फोड नावाच्या शेतात गेले होते. बराच वेळ ते घरी आले नाहीत. तेथील शेतात दुसरे शेतकरी वैरण आणायला गेले असता एका झाडाला गळफास लावलेली व्यक्ती दिसली. पुढे जावून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी ही घटना गावात आणि पोलिस पाटलांना सांगितली. पोलीस पाटलांनी राधानगरी पोलीसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सोळांकूर येथे पाठवले शवविच्छेदन झाल्यावर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आहेत.

Related Stories

कोल्हापूर : कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरांच्या बदनामीचे प्रयत्न

Archana Banage

भूमीपुत्रांना फौंड्रीच्या प्रशिक्षणासह नोकरीची हमी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंत वाढ, आज 28 मृत्यू, 1327 नवे रूग्ण

Archana Banage

पूरग्रस्त कोणीही वंचित राहणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

आर्थिक वादातून पुलाची शिरोलीत युवकाचा खून

Archana Banage

आता सण-उत्सवांवर ‘जीएसटी’चे सावट…

Kalyani Amanagi