Tarun Bharat

पुढील चार दिवस जोरदार पाऊस

Advertisements

पणजी वेधशाळेची माहिती

प्रतिनिधी / पणजी

रविवारी पावसाने गोव्याला झोडपले. सोमवारी थोडीफार उसंत घेतली. गेल्या 24 तासात सर्वाधिक 6.5 इंच पावसाची नोंद वाळपईत झाली. वाळपईत गेल्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढलेला आहे. पणजीत 119.5 इंच पाऊस झालेला असून यंदाच्या मौसमात सरासरीपेक्षा तो 33 इंच जादा आहे. 21 ऑगस्टपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मान्सून सक्रिय असून गोव्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण कमी होते. पणजीत अनेक दिवसांनी सूर्यदर्शन झाले व जनतेला तेवढाच दिलासा मिळाला. गोव्यात पूर्वोत्तर भागात सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी अधिक चालूच होते. पणजीत पावसाने उसंत घेतली.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारादेखील हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या 24 तासात सर्वाधिक 6.5 इंच पावसाची नोंद वाळपईत झाली. वाळपईतील हा यंदाच्या मौसमातील प्रथमच सर्वाधिक पडलेला पाऊस होय. पेडणेमध्ये 2 इंच, पणजीत 2.5 इंच, जुने गोवे 2 इंच, मुरगाव 1.5 इंच, केपेमध्ये 3 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण गोव्यात सरासरी पाऊस आता 125 इंच एवढा झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी 27 इंच पाऊस अधिक झालेला आहे.

Related Stories

राज्याच्या आज अर्थसंकल्प

Amit Kulkarni

कमलाकांत धामस्कर यांना स्वा.सै.संघटना गोवातर्फे श्रद्धांजली

Omkar B

खांडोळा श्री दाड देवाची 6, 7 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना

Amit Kulkarni

कोटय़वधींची संसाधने घेऊनही मडगावची कचरा समस्या जैसे थे

Patil_p

डिचोली बाजारात आजपासून वाहनांना प्रवेशबंदी.

Amit Kulkarni

पणजीसाठी 48 इलेक्ट्रीक बसगाडय़ा

Amit Kulkarni
error: Content is protected !!