Tarun Bharat

पुढील वर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करूया

Advertisements

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई व व्यसनमुक्ती समन्वय मंच महाराष्ट्रच्या वतीने सावंतवाडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करताना पुढील वर्ष धुंदीत नको शुद्धीत साजरे करूया हा संदेश तरूणाईला देण्यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपालिकेच्या सहकार्याने सावंतवाडीच्या आठवडा बाजारात व्यसनमुक्ती प्रबोधन पोस्टर प्रदर्शन आणि पथनाट्य असा उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमाला युवाईसोबत सावंतवाडी च्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शनाचे उद्घघाटन कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रा.मिलिंद कासार आणि प्रा. सुमेधा नाईक यांच्या सहकार्याने राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चला व्यसनांना बदनाम करुयाहे पथनाट्य सादर केले. नागरिकांनी हे पथनाट्य पाहाण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी आठवडा बाजारातील नागरिकांना पत्रक वाटून तरुणांना दारुच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे आवाहन. अलिकडे सरत्या वर्षाला दारू पिऊन निरोप द्यायचा प्रघात सुरू झाला आहे.यामुळे तरूण पिढी मोठ्या प्रमाणात चंगळवादी चक्रात ओढली जात आहे.व्यसनाधिनतेमुळे तरूण शक्ती क्षीण होत चालली आहे.युवक ही देशाची मोठी संपत्ती आहे.ती संपत्ती टिकवून आपला देश बलशाली करुया असे आवाहन अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे.यावेळी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर वाटवे, गोपुरी वाचन संस्कृती विकास ग्रुपचे शुभम मठकर आदी उपस्थित होते.

Related Stories

कोरोनावर चीनचा ‘त्रीसुत्री फॉर्म्युला’!

NIKHIL_N

चिंदर येथे 20 बेडचा विलगीकरण कक्ष सुरू

Anuja Kudatarkar

शिक्षक चंद्रकांत सावंत यांना “मानद डॉक्टरेट”

Anuja Kudatarkar

वेतन रोखलेल्या शिक्षकांना दिलासा

NIKHIL_N

लग्न ‘सोहळय़ा’चा अट्टाहास नडला

NIKHIL_N

कलंबिस्त तलाठी यांची बदली करू नका- ग्रामस्थांची मागणी

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!