Tarun Bharat

पुणे-बेळगाव जनशताब्दी एक्सप्रेसची 9 तारीख हुकण्याची शक्यता?

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे-मिरज लोहमार्गावर देखभाल-दुरुस्ती, सिग्नलिंग आणि दुहेरीकरणाची कामे सुरू असल्याने 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया पुणे-बेळगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची तारीख हुकण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी 9 फेब्रुवारीपासून दररोज धावेल व त्याचे उद्घाटन पुणे स्टेशनवर करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी यापूर्वी दिली होती. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, पुणे-मिरज लोहमार्गावर गेल्या महिनाभरापासून देखभाल-दुरुस्ती, सिग्नलिंग, ओएचई तसेच दुहेरीकरणाची कामे सुरू आहेत. परिणामी कोयना एक्स्प्रेस रद्द तर पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा डेमू अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले असून दररोज या गाडय़ांना दोन-तीन तासांचा विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-बेळगाव जनशताब्दी एक्सप्रेस सुरू केल्यास तिला देखील दररोज विलंब होईल व क्वचितप्रसंगी ती रद्द देखील केली जाऊ शकते.

Related Stories

‘सोलापुरातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास आंदोलन’

Archana Banage

कामगारांच्या थकित पगारी अदा केल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही; कामगारांचा इशारा

Archana Banage

सोलापूर : दुकानांच्या वेळेत बदल नाही; शहर-जिह्यातील आदेश कायम

Archana Banage

सोलापूर : जुगार अड्डयावर छापा, इमारतीवरून उडी मारल्याने एकाचा जागीच मृत्यू

Archana Banage

बनावट सह्या प्रकरणी मक्तेदाराविरुद्ध गुन्हा

Archana Banage

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावर बाजार 30 जूनपर्यत बंदच

Archana Banage
error: Content is protected !!