Tarun Bharat

पुणे-बेळगाव रेल्वे सेवा 9 फेब्रुवारीपासून

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुणे ते बेळगावदरम्यान येत्या 9 फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा सुरू होत आहे. या मार्गावर धावणाऱया जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले.

9 फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकावर या गाडीचे उद्घाटन होणार असून ती गाडी दररोज या मार्गावर धावणार आहे. पुण्यातून सकाळी 6 वाजता ही गाडी सुटणार असून बेळगाव येथे दुपारी 1 वाजता पोहोचेल. पुणे-बेळगाव अंतर 417 किलोमीटरचे असून केवळ सात तासात ही गाडी ते अंतर कापणार आहे.

सद्यःस्थितीत पुणे-बेळगावदरम्यान एकही रेल्वे थेट धावत नाही. त्यामुळे इतर गाडय़ांच्या प्रवासाने बेळगावला जाण्यास 8 ते 9 तासांचा कालावधी लागतो. मात्र, ही गाडी जलद असणार आहे. या मार्गावर एकूण 9 स्थानके असतील. तसेच या एक्सप्रेसचा तिकीट दर इतर एक्सप्रेसप्रमाणेच असणार आहे.

Related Stories

संकेश्वरात बारा वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह

Rohan_P

अनगोळमध्ये स्मार्ट सिटीच्या कामामुळे समस्या

Amit Kulkarni

मान्सून कर्नाटकात दाखल

datta jadhav

बेळवट्टी येथे गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni

गांधीनगरमधील धोकादायक गटारीवर सीडी घालण्याची गरज

Amit Kulkarni

वर्दळीमुळे रामघाट रस्ता बनला जीवघेणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!