Tarun Bharat

पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा विरोध

ऑनलाईन टीम / पुणे :


पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. 
ते म्हणाले, पुण्यात पुढील सात दिवस मिनी लॉकडाऊन असणार आहे. या अंतर्गत पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे.


याबाबत बोलताना भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली. ते म्हणाले, पुण्यात जे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातील दोन-तीन गोष्टींना आमचा विरोध आहे. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केली आहे. 


तसेच पीएमपीएमल बस बंद करण्यासही भाजपने विरोध दर्शवला आहे. बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? असा प्रश्न विचारतानाच 40 टक्के क्षमतेने पीएमपीएमएल बस सुरु ठेवण्याची मागणी बापट यांनी केली आहे. यासोबतच हॉटेल्स पूर्ण क्षमतेने बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी केली आहे. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.


‘काही द्यायचे नाही आणि नियम लावायचे, हे चूक’पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवे. लोकांना रेशन द्या. काही द्यायचे नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी यावेळी केले. तसेच संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री 8 पासून संचारबंदी करा, अशी मागणीही गिरीश बापट यांनी केली आहे.

Related Stories

साताऱयात रुग्णांना मिळेनात बेड

Patil_p

घरातून दीड लाखाचे दागिने चोरल्याची तक्रार

Patil_p

सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज; त्यांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही

datta jadhav

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

एल्गार परिषदेचा आणि आमचा काही संबंध नाही : प्रकाश आंबेडकर

Archana Banage

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं खास निमंत्रण

Archana Banage