Tarun Bharat

पुणे, मुंबईकरांनी वाढवली जिल्हय़ाची चिंता

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांचा आकडा वाढला मात्र नंतर त्याचा वेग मंदावला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच कोरोनामुक्त होणाऱयांची वाढलेली संख्याही जिल्हय़ाला दिलासा देऊ लागली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसात पुण्या मुंबईहून जिल्हय़ात आलेले नागरिक बाधित म्हणून समोर येऊ लागल्याने जिल्हावासियांचा आणि प्रशासनाचा जीव टांगणीला लागला आहे. मंगळवारी रात्री सातारा शासकीय रुग्णालयात दाखल असणाया 58 व 31 कैद्यांचे 14 दिवसांनंतर चे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने त्यांना घरी सोडण्यात आली आहे. मंगळवारी खंडाळा तालुक्यातील एक, खटाव तालुक्यात 2 तर कराड तालुक्यातील म्हासोली गावात तब्बल पाचजण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव चिंताजनक असून आता शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील काही दिवस घरात बसून कोरोनाचा संसर्ग टाळावा लागणार आहे. मुख्य म्हणजे संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. एका बाजूला मायक्रो कंटेनमेंट झोन वगळता जिल्हय़ाचे निर्बंध कमी झाल्याने लोकांची फिरती वाढली असताना वाढते रूग्ण चिंतेची बाब ठरले आहेत.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला  लोणंद येथे मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी (ता. खटाव) येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले  55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

म्हासोलीत पाच वाढले, एकुण आठ, त्यात एका कुटुंबात सहा

कराड दक्षिणच्या उंडाळे खोऱयात असणाऱया म्हासोली येथे पुण्याहून आलेला एक युवक  कोरोना बाधित सापडला होता. त्याच्या संपर्कात असणाऱया घरातीलच पाच जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे म्हासोलीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठ वर जाऊन पोहोचली आहे. तर एकाच कुटुंबातील कोरोना बधितांची आकडा  सहावर  गेला आहे 

पुणेहून आपल्या गावी म्हासोली (कराड) येथे आलेला 35 वर्षीय युवक कोरोना  बाधित  झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील लोकांसह गावातील जवळपास 50 लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. तर घरातील अति संपर्कात असणाऱयांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यात त्याची आई, भाऊ, चुलते, चुलती व वहिनी अशा पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे म्हासोलीत रुग्णांचा आकडा 8 वर गेल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लोक गेले शेतातील वस्तीत राहायला

बधितांच्या संपर्कात कोण कोण आले? याची माहिती गोळा करण्याचे काम  प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरू असताना मात्र गावकऱयांकडून माहीती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कोरोनाची  साखळी  शोधताना अडचण निर्माण होत असल्याचे तेथील अधिकाऱयांनी सांगितले आहे. गावाच्या चारीही बाजूने सीमा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा वाढत असलेला आकडा पाहात अनेकांनी आपल्या कुटुंबासहित गावाच्या बाहेर असणाऱया शेतातील वस्तीवर  राहायला गेले आहेत. जेणे करून कोणाच्याही संपर्कात न येता  आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास सुरुवात केली असल्याचे पहावयास मिळत आहे 

खंडाळय़ातील महिला मुंबईत बाधित, पाडळीत युवकाला लागण 

तर मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिह्यात गणाना केली जाणार नाही. मात्र तालुक्यातील पाडळी येथील मुंबईहून आलेला युवकही मंगळवारी कोरोना बाधित झाल्याने खंडाळा तालुका हादरला आहे. 

लोणंदनजीक असलेल्या पाडळी गावातील एक तरूण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथून आपल्या गावी आलेला होता. या तरुणाला स्थानिक प्रशासनाने 14 तारखेपासूनच होम क्वारंटाइन केलेले होते. आज सकाळी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने पाडळी गाव सील करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेले आठ जण हाय रिस्क मध्ये असून 26 जण लो रिस्कमध्ये आहेत. तहसीलदार दशरथ काळे, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील, सपोनि संतोष चौधरी यांनी भेट देऊन तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गावात पुणे, मुंबईहून 46 जण आले असून ते होम क्वारंटाईन आहेत.

मायणीत दोन रूग्ण, गाव सील

खटाव तालुक्यात चारच दिवसापूर्वी खरसिंगे येथे एक रुग्ण सापडला होता. मंगळवारी मायणी येथील 55 वर्षीय पुरूष आणि 48 वर्षीय महिला असे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे मायणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. हे रूग्ण अकोला येथून प्रवास करून आले होते. मायणी बाजारपेठ मोठी आसल्यामुळे मायणी परिसरातील अनेक खेडयातील लोक दैनंदिन खरेदीसाठी येतात. प्रशासनाने कडक अंमलबजावणी करूनही अनेक लोक खरेदीच्या निमित्ताने, दवाखान्याच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत. परंतु सकाळी दोन रुग्ण सापडल्याची वार्ता परिसरात पसरताच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. मायणी गाव पूर्ण लॉकडाऊन केला असून प्रशासन लक्ष ठेऊन आहे. 

10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह 

कोरोना बाधितांच्या सहवासात आलेल्या व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण करण्यात आलेल्या 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 

90 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 

19 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात  24, फलटण येथे 14, कृष्णा कराड येथे 32, कोरेगाव 12, वाई 8अशा 90 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 

73 कोरोनामुक्त, 71 जण उपचारार्थ 

जिह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची एकुण संख्या- 146 झाली असून यापैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या 75 आहे तर मृत्यू झालेले 2 रुग्ण आहेत. जिल्हय़ात मृत्यूदर कमी असला तरी आता ग्रामीण भागात वाढू लागलेली बाधितांची संख्या चिंताजनक वाटू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ङकारागृहातील बाधित 2 रुग्ण झाले पूर्णपणे बरे; 90 जणांना केले दाखलङ 

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाया 31 व 58 वर्षीय जिल्हा कारागृहातील 2 कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने या 2 रुग्णांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचित्किस डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री दिली आहे.

         सध्या  सातारा येथे 25, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 33 असे एकूण 68 कोविड-19 बाधित रुग्ण दाखल आहेत. ङत्यापैकी 66 जणांचे लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित 2 रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.ङ

         जिह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 75 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

क्वारंटाईन असलेल्यांनी नियम पाळलेच पाहिजेत

सातारा जिल्हय़ातील विविध तालुक्यांमध्ये परवानगी घेवून तसेच विनापरवानगी आलेल्या नागरिकांची तपासणी करुन त्यांना होमक्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे ग्रामसमित्या, वॉर्ड समित्या करत आहेत. मात्र, या नागरिकांनीच क्वारंटाईन कालावधीत गावात, परिसरात न फिरता संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आता सर्वांनीच काळजी घेण्याची गरज असून बाहेरुन आलेल्यांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन या लढाईत योगदान दिले पाहिजे. 

Related Stories

सिव्हिल रस्त्याचे काम दर्जाहिन

Patil_p

लम्पी स्किनने सातारा जिल्ह्य़ात ५ जनावरे दगावली

Archana Banage

कोल्हापूर : लक्षतीर्थमध्ये बालविवाह रोखला

Archana Banage

तीन लाखाची खंडणी मागणाऱया गुंडास अटक

Patil_p

जिल्हय़ात नवे 25 पॉझिटिव्ह रूग्ण

Archana Banage

सातारा : जावली तालुक्यात 6 वर्षीय मुलीवर अत्याचार

datta jadhav
error: Content is protected !!