Tarun Bharat

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर इनोव्हाला भीषण अपघात; 2 ठार

ऑनलाईन टीम / पुणे : 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कामशेत बोगद्यात भरधाव वेगातील इनोव्हा कारचा टायर फुटला. त्यामुळे कारचालकाचा कारवरील ताबा सुटून कारने पुढे असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. 

अभिजीत रामलिंग घवले (GST डेप्युटी कमिशनर) व शंकरगोडा यत्नाल असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर घवले यांची पत्नी आणि गाडीचा चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोमटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कामानिमित्त घवले कुटुंब मुंबईहून पुण्याला येत होते. दरम्यान, कामशेत बोगद्यात भरधाव वेगातील इनोव्हा कारचा टायर फुटला. त्यामुळे कारचालकाचा कारवरील ताबा सुटून कार पुढे धावणाऱ्या ट्रॅकला जोरात धडकली. यात घवले आणि यत्नाल यांचा मृत्यू झाला. तर घवले यांची पत्नी आणि चालक जखमी झाला. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.

Related Stories

वादग्रस्त वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची जाहीर माफी

datta jadhav

तिरंगा उलटा फडकावल्याप्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

‘सोमय्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, दगडफेकीच्या आरोपावर भावना गवळींची प्रतिक्रिया

Archana Banage

लातूर जिल्हा बँक माफियांच्या माध्यमातून हस्तगत करण्याचा प्रयत्न – किरीट सोमय्या

Archana Banage

शिवसेनेत नसताना संभाजीराजेंना तिकीट का द्यावे?

datta jadhav

शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर; फेब्रुवारी महिना बघणार नाही

datta jadhav