Tarun Bharat

पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजार 79 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 43 हजार 954 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.09 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 197 रुग्णांपैकी 95 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 26 हजार 450 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर  बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.57 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 7 हजार 749 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 67 हजार 79 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

नारायण राणे यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी

datta jadhav

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? ; राज ठाकरेंचे भन्नाट उत्तर

Archana Banage

महाराष्ट्रात 3,994 नवे कोरोनाबाधित; 75 मृत्यू

Tousif Mujawar

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त : अजित पवार

Tousif Mujawar

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला आपची खुली ऑफर

Abhijeet Khandekar

डॉ.सुधाकरराव जाधवर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजला नॅकचा ‘ब’ दर्जा

Tousif Mujawar