Tarun Bharat

पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 73.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1  लाख 70  हजार  314  रुग्णांपैकी  1 लाख 32 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 33 हजार 697 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.36 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77.86  टक्के आहे. 

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 82  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 933, सातारा जिल्ह्यात 489, सोलापूर जिल्ह्यात 363, सांगली जिल्ह्यात 686  तर कोल्हापूर जिल्ह्यात 611 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 86 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 37 हजार 936  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

कॉंग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना 1 वर्षाची शिक्षा

Archana Banage

पुण्यातील कोरोना : आज 244 नवे कोरोना रूग्ण, 261 डिस्चार्ज

Tousif Mujawar

सोलापूर : चिखर्डेतील मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिला अपघातात ठार

Archana Banage

राज्यात बोलघेवड्या नेत्यांची गर्दी; फडणवीसांचे ‘मविआ’वर टीकास्त्र

Archana Banage

सलिम,सलमान खान प्रकरण; विश्वास नांगरे पाटलांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

Archana Banage

ठाकरेंचीच शिवसेना जिंकली, दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाची परवनगी

Archana Banage