Tarun Bharat

पुणे विभागातील 25 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 25 हजार 507 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 42 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 15  हजार 525 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 743 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.30 टक्के इतके आहे.अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


पुणे जिल्हयातील 35 हजार 528 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 21 हजार 411  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह  रुग्ण संख्या 13 हजार 132  आहे. या मध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 हजार 770, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 636 व कॅन्टोंन्मेंट 91, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 522, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 985रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये पुणे महानरगपालिका क्षेत्रातील 796 पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका क्षेत्रातील 94,पुणे कॅन्टोंमेन्ट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 37, जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील 20 रुगणांचा समावेश आहे. 


तसेच 557 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के इतके आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

पाव ग्रॅम ड्रग पकडून अधिकाऱ्यांनी जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली; संजय राऊतांचा NCB वर निशाणा

Abhijeet Khandekar

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईनच

Archana Banage

लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; सीडीएस बिपीन रावत जखमी

Abhijeet Khandekar

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी जळगावातील ‘प्लेसमेंट एजन्सी’चा संचालक अटकेत

datta jadhav

सत्ताधाऱ्यांकडून अनेक यंत्रणाचा वापर पण जनतेनेच योग्य उत्तर दिले- अजित पवार

Abhijeet Khandekar

विजय सेतुपती आपल्या नव्या लुकमध्ये; चाहत्यांना केले चकित

Abhijeet Khandekar