Tarun Bharat

पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 61 हजार 507 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 58  हजार 895 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 12 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हयातील  कोरोना बाधित एकूण 2 लाख 99 हजार 353 रुग्णांपैकी 2 लाख 58 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 33 हजार 636 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 859  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.47  टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 47 हजार 112 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 61 हजार 507  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

महाराष्ट्र : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.73 टक्क्यांवर!

Tousif Mujawar

पुढील पाच दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा

Abhijeet Khandekar

पुण्यात होणार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना

datta jadhav

आज मुंबईत लसीकरण बंद

Archana Banage

चंद्रकांत पाटील जगातील सर्व पार्लमेंटच्या जागा जिंकू शकतात ; संजय राऊतांचा खोचक टोला

Archana Banage

पुणे विभागातील 4.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar
error: Content is protected !!