Tarun Bharat

पुणे विभागातील 32,634 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 32 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 18 हजार 922 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 708 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.32 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.13  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील 44 हजार 361 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 27 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 15 हजार 478 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 453 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 70 हजार 41 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 66 हजार 395 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 646 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 12 हजार 611 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 53 हजार 222 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

Related Stories

ओबीसी आरक्षणाकरीता भाजप ओबीसी मोर्चाचे गुरुवारी ‘बोंबाबोंब आंदोलन’

Tousif Mujawar

धनगर समाज शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

Archana Banage

राऊतांचा संभाजीराजेंना इशारा; म्हणाले, कितीही आकडे मोड करावी…

Archana Banage

वैयक्तिक कामांसाठी चार्टर्ड विमानाचा वापर नाही

Archana Banage

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर ‘ईडी’चे छापे

datta jadhav

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage