Tarun Bharat

पुणे विभागातील 38,584 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 38 हजार 584 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 64 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 24 हजार 444 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1  हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 786  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.91  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, पुणे जिल्हयातील  53 हजार 450 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 32  हजार 975 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 19 हजार 127 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 235 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 41 व पुणे कॅन्टोंन्मेंट 237, खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 475, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  92  रुग्णांचा समावेश आहे.  

तर पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 999, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 206  व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 62, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 556 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.52  टक्के इतके आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण  3 लाख  15 हजार  298  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   3 लाख 12 हजार 368  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 930 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 46  हजार 730 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.          

Related Stories

शंभर वर्षातील गडद संकट

Patil_p

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वतंत्रपणे लढणार

datta jadhav

पवारांना युपीए अध्यक्ष करा, गोऱ्हेंचा सल्ला

Archana Banage

ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं महाराष्ट्र लवकरच देशातील पहिलं राज्य असेल: मुख्यमंत्री

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 19,212 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा

datta jadhav