Tarun Bharat

पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :


पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90  हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 29  हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.15  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 16 हजार 776  रुग्णांपैकी 2 लाख 92 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 16 हजार 785 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे तर बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.35  टक्के आहे. 

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 54 हजार 986 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 90 हजार 481 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

datta jadhav

चिंताजनक : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग

Tousif Mujawar

आपण कुत्री, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्त्व करत नाही; उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान

Abhijeet Khandekar

विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर …; मनसेचा इशारा

Archana Banage

कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही – ऊर्जामंत्री

Abhijeet Khandekar

मोठा दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 61,607 जण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar
error: Content is protected !!