Tarun Bharat

पुणे विभागातील 4 लाख 63 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख  63 हजार 429 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 99 हजार 630 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या  22 हजार 279 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 922 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.75 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 21 हजार 398 रुग्णांपैकी 3 लाख 1 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 12 हजार 576 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.69 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 41 हजार 375 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  4 लाख  99 हजार 630  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक; पुणे ATS ची कारवाई

datta jadhav

कोरोनाचा धोका : पंचावन्न पार पोलिसांना सुट्टी; मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

Archana Banage

Tauktae Cyclone : नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Archana Banage

राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी: मंत्री बच्चू कडू

Archana Banage

पोखरण अणूचाचणी तंत्रज्ञ संजय चव्हाण यांचे निधन

datta jadhav

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर करा : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Archana Banage