Tarun Bharat

पुणे विभागातील 4.99 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख 99 हजार 798 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 537 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 14  हजार 855 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.38 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 38 हजार 596 रुग्णांपैकी 3 लाख 19 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 10  हजार 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 236  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  94.42 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 80 हजार 579 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  29 हजार 537 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

शरद पवारांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

Archana Banage

खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

Archana Banage

जॅकलिन, नोरा यांना दिलेल्या भेटवस्तू ईडी जप्त करण्याची शक्यता

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रातील 12,29,339 रुग्ण कोविडमुक्त!

Tousif Mujawar

पुण्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार बागा, उद्याने

Tousif Mujawar

नुपूर शर्माप्रमाणे कोश्यारींवर कारवाई का नाही?; उदयनराजेंचा संतप्त सवाल

datta jadhav