Tarun Bharat

पुणे विभागातील 41,541 रुग्ण कोरोनामुक्त !

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुणे विभागातील 41 हजार 541 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 70 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 27 हजार 130 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 824 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.87 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


यापैकी पुणे जिल्हयातील 58 हजार 27 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 36 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 20 हजार 545 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 14 हजार 748, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 813 व पुणे कॅन्टोंन्मेंट 257, खडकी विभागातील 46, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 581, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 100 रुग्णांचा समावेश आहे.  


पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 455 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 61, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 236 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 68, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 34 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 593 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.09 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे.

Related Stories

पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह तर 8 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 77 हजार 927 कोरोनामुक्त!

Rohan_P

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी ओलांडला 18.80 लाखांचा टप्पा

Rohan_P

गोवा कुरुक्षेत्र : विधानसभा निकाल : LIVE UPADATE : उत्तर गोव्यातील प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Vivek Porlekar

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन! म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही…

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!