Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 743 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 10  हजार 944 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 56 हजार 819 रुग्णांपैकी 3  लाख 39 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 8  हजार 588 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 621  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  95.18 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 82 हजार 69 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  55 हजार 743  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय; शैलेश टिळक यांची भावूक प्रतिक्रिया

datta jadhav

अखेर ‘तो’ शब्दही घेतला मागे;तानाजी सावंतांना अजित पवारांनी सुनावलं

Abhijeet Khandekar

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश – सचिन सावंत

Archana Banage

शिरूर लोकसभेची जागा भाजपा लढविणार

datta jadhav

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या : शरद पवार 

Tousif Mujawar

शिवसैनिकांच्या केसाला जरी हात लागला तर…ठाकरेंचा इशारा

Abhijeet Khandekar