Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 9  हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 60 हजार 758 रुग्णांपैकी 3  लाख 44 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 7  हजार 161 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 685  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.41 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  95.61 टक्के आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 60 हजार 972 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  60 हजार 717 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक : अमित देशमुख

Tousif Mujawar

फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेसाठी उद्या निवड चाचणी

datta jadhav

कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेत जिल्हयात मतदानास सुरुवात : डॉ. राजेश देशमुख

Tousif Mujawar

राज्यात थंडी कमी; उकाडा कायम

datta jadhav

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

Archana Banage

तहसीलदारांना क्वारटांइन करा -शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार

Archana Banage